राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सर्वांनी एकत्रित येऊन या महामारीपासून बचाव करण्यासाठी नगर जिल्हा बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.
राज्यातील नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने मदत देण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती चेअरमन उदयराव शेळके यांनी दिली.
नगर जिल्हा बँकेच्या वतीने रुपये एक कोटी धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उदयराव शेळके, व्हाइस चेअरमन माधवराव कानवडे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर घुले-पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
























































