आई तुझ्याचसाठी… ‘मदर्स डे’ला गुगलकडून ‘डुडल’ भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. आज लोकांनी कोरोनासंबंधी नियम पाळून घरातल्या घरात ‘मदर्स डे’ साजरा केला. सोशल मीडियाकर आईचे फोटो शेअर करून तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ‘मदर्स डे’च्या दिकशी गुगलने खूप सुंदर, आकर्षक ‘डुडल’ बनवून ते जगभरातील मातांना समर्पित केले आहे.

आई म्हणजे बलिदान आणि त्यागाचे प्रतीक! गुगलने ऍनिमेटेड डुडलच्या माध्यमातून आज मदर्स डे साजरा केला. गुगलने रंगीबेरंगी पॉप अप कार्डचा वापर करून मातांना शुभेच्छा दिल्या. हे एक प्रकारचे डिजिटल कार्ड आहे. ते ओलेकियाने डिझाईन केले आहे. डुडलकर क्लिक केल्यावर एक कार्ड पॉप अप होऊन उघडले जाते. त्यावर खूप सारे हृदय आहेत. अत्यंत कल्पकतेने तयार केलेले डुडल नेटीजन्सला खूप आकडले आहेत. मुलांकर निरपेक्ष प्रेम करणाऱया सर्क मातांसाठी ते तयार करण्यात आलंय.

प्रत्येक देशामध्ये ‘मदर्स डे’ वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. ब्रिटनमध्ये मार्च महिन्याच्या चौथ्या रविवारी, ग्रीसमध्ये 2 फेब्रुवारी साजरा होतो.