मुसळधार पावसातही पोहोचवलं जेवण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेवणाची ऑर्डर घेऊन भरपावसात गुडघाभर पाण्यात उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या डिलिव्हरी बॉयच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. डॉमिनोज कंपनीनेदेखील आपल्या या डिलिव्हरी बॉयचे ‘फूड सोल्जर’ असे म्हणत काैतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल येथे मुसळधार पाऊस पडला होता. रस्त्यांवर भरपूर पाणी साचले होते. अशा परिस्थितीतदेखील शोवन घोष हा डिलिव्हरी बॉय जेवणाची ऑर्डर घेऊन इच्छित स्थळी पोहोचला होता.