
देशात शहरांबरोबरच ग्रामीण, आदिवासी भागांतही कोरोना झपाटय़ाने फैलावला आहे. हा फैलाव आटोक्यात आणण्याच्या हेतूने केंद्र सरकारने रविवारी गावांसाठी स्वतंत्र गाईडलाइन्स जारी केली. त्यानुसार ग्रामीण भागांत टेस्टिंग आणि क्वारंटाइनवर भर दिला जाणार असून आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी आणि आरोग्य सेविकांसह शिक्षकांना सर्दी-तापाच्या रुग्णांवर विशेष देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱयांना रॅपिड ऍण्टीजेन टेस्टसह विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार
गावात कुठेही सर्दी-खोकला किंवा तापाचा रुग्ण आढळल्यास आशा सेविकांनी तत्काळ कम्युनिटी हेल्थ ऑफिसरना फोन करून कळवावे. आशा सेविकांना हेल्थ सॅनिटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीने मदत करावी. सर्दी-तापाच्या रुग्णांसाठी प्रत्येक उपकेंद्रात विशिष्ट वेळ ठरवून ओपीडी सुरू ठेवावी. सर्व उपकेंद्रांवर रॅपिड ऍण्टीजेन टेस्टचे किट उपलब्ध करावे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कर्जावर पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर पुरवावे. आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत ही व्यवस्था करण्यात यावी.
जवळपास 80 ते 85 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यांना रुग्णालयांत दाखल करण्याची गरज नाही. अशा रुग्णांना घरात किंवा कोविड केअर केंद्रात आयसोलेट करावे.


























































