रस्ते, वीज या सेवा लवकरच पूर्वपदावर आणल्या जातील – तहसीलदार अजय पाटणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील सर्व नागरिकांनी रविवारी जो संयम दाखवला, प्रशासनाच्या खबरदारी आवाहनाचे पालन केले. त्यामुळे मालवण तालुक्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत धन्यवाद. लवकरात लवकर रस्ते, वीज या सेवा पूर्वपदावर आणून नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले जातील. नागरिकांनी संयम दाखवावा असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

चक्रीवादळमुळे मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो झाडे पडली. काही ठिकाणी रस्त्यावरून संपर्क तुटला आहे. रविवारपासून वीज पुरवठा खंडित आहे. मोबाईल नेटवर्क मध्येही अनेक अडचणी आहेत. संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरी पडलेली झाडे हटवण्याची कामे सुरू आहेत. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्यामार्फत काम सुरू आहे.

मालवण तालुक्यात झालेल्या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक पथक यांच्यामार्फत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु अनेक मार्गांवर पडझड मुळे रस्ते बंद, नेटवर्क नाही, वीज नाही यामुळे यंत्रणांना काम करताना अडथळे येत आहेत. तरी, नागरिकांना विनंती आहे की, वादळात झाडे, विजखांब पडून घरांचे व अन्य नुकसान झाले आहे. पत्रे व अन्य साहित्य उडून गेले आहे. वादळामुळे जे काही नुकसान झाले त्या अनुषंगाने नुकसानीचे फोटो नागरिकांनी काढून ठेवावे. पंचनामे वेळी त्याचा उपयोग करणे सोयीचे होईल.

वादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे वीज पुरवठा, मोबाईल, रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सय्यम बाळगावा, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे. वादळामुळे नुकसान झालेल्या व पावसाळ्यापूर्वी घरे दुरुस्ती करणाऱ्या नागरिकांना घर दुरुस्तीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ज्या दुकानांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक कागद, पत्रे, खिळे, विटा व अन्य दुरुस्ती साहित्य दुकाने 20 मेपर्यंत पूर्णवेळ उघडण्यास जिल्हाधिकारी परवानगी दिली आहे, असेही तहसीलदार यांनी सांगितले.