लॉकडाऊन मोडणाऱ्यांना ‘जय श्री राम’ लिहिण्याची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तरीही काही नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरत आहेत. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने नवीन शक्कल लढवली आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात पोलीस लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर ‘रामा’चे नाव लिहून घेत आहेत. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून चार ते पाच पानांवर रामाचे नाव लिहून घेतले जाते. त्यानंतर त्याची सुटका करण्यात येते, असे सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले.