55 हजार फोटोंमधून चंद्रदर्शन, पुण्यातील दहावीच्या विद्यार्थ्यानं केली कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या काळोखात आपल्या मंद प्रकाशाने अवघं नभांगण उजळून टाकणाऱया चंद्राचं देखणं रूप आपल्या कॅमेऱयात कैद करणं सर्वसामान्यांपासून अॅस्ट्रोफोटोग्राफरपर्यंत सर्वांनाच आवडतं. गेल्या काही दिवसांपासून चंद्राचा एक रंगीबेरंगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो टिपलाय पुण्यातील प्रथमेश जाजू या दहावीतील विद्यार्थ्यानं. टेलिस्कोप आणि पॅमेऱयाच्या मदतीने चंद्राच्या छोटय़ा-छोटय़ा भागांचे तब्बल 55 हजार फोटो जोडून प्रथमेशने चंद्राचा हा एकच फोटो तयार केला आहे. या फोटोसाठी तब्बल 186 गिगाबाईट डेटा लागला आहे.

स्टार ट्रेक, स्टार वॉरसारख्या चित्रपटांमुळे लहानपणापासूनच प्रथमेशला ग्रह-ताऱयांविषयी आकर्षण वाटू लागले. याच आवडीपोटी सहावीत असताना पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा तो सदस्य झाला. ही देशातील सर्वात जुनी खगोलशास्त्राचा अभ्यास करणारी संस्था आहे. प्रथमेश सध्या इथे मेंबर आणि वॉलेंटियर आहे. नुकतेच त्याने आपल्या घराच्या गच्चीवरून चंद्राचे विलोभनीय रूप टिपले आहे. भविष्यातही अॅस्ट्रोफोटोग्राफी आणि खगोलशास्त्राचा अभ्यास सुरूच ठेवणार असल्याचे तो सांगतो.

असा झाला फोटो तयार

या प्रक्रियेबाबत प्रथमेश सांगतो, 3 मे रोजी रात्री 1 ते पहाटे 5 या दरम्यान हे फोटो काढले आहेत. त्यासाठी सेलेस्टेरॉन 5 कॅसेग्रेन टेलिस्कोप, स्कायवॉचर ईक्यू 3-2 गो माऊंट, झेडडब्लूओ एएसआय120एमसी-एस सुपर स्पीड यूएसबी पॅमेरा आणि जीएसओ 2 एक्स बारलोव्ह या लेन्सचा वापर केला. या खास कॅमेऱयाच्या एका व्हिडीओत साधारण 2 हजार फ्रेम मिळतात. अशा 38 व्हिडिओमधून मला 55 हजार फोटो मिळाले. पुढे तो म्हणाला, या फोटोंवर विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने शार्प, इनहान्स यासारख्या विविध प्रक्रिया केल्या. त्यानंतर वेगवेगळे फोटो एकत्र करून चंद्राची एक इमेज तयार केली. या प्रक्रियेसाठी साधारण 36 ते 38 तास लागले. हे फोटो प्रथमेशच्या इन्स्टाग्राम पोस्टवर पाहायला मिळतील.

…म्हणून चंद्र दिसतोय रंगीबेरंगी

प्रथमेशने काढलेल्या फोटोंमध्ये चंद्राचा रंग पांढरा न दिसता रंगीबेरंगी दिसतोय. याबाबत तो म्हणाला, चंद्रावरील खनिजसाठा आपल्याला डोळ्यांनी सहज दिसत नाही. परंतु टेलिस्कोपच्या आणि कॅमेऱयाच्या मदतीने तो आपल्याला फोटोत पाहायला मिळतोय. निळा रंग आयर्न, टायटॅनियम आणि ऑक्सिजन दर्शवतो. तर नारंगी आणि जांभळा रंग या भागात खनिजाचे प्रमाण कमी असल्याचे दर्शवते. चंद्राच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश जास्त पडतोय तिथे सफेद आणि करडा रंग पाहायला मिळतोय.