कोरोनाच्या दुसऱया लाटेत राज्यातील परिस्थिती स्थिर होत आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर राज्यापेक्षा जास्त आहे. वाढता मृत्यूदर रोखणे हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर आव्हान बनले आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 1ः75 आहे, तर सांगली जिह्याचा मृत्यूदर तब्बल 2ः25 आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. त्यातील 48 ते 49 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार करता सध्या सांगली जिह्यात विविध कोविड हॉस्पिटलमध्ये 15 हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत दाखल एक लाख 2906 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3016 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे हे प्रमाण दोन 2ः25 टक्के आहे. जिह्यातील रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होऊ लागली असली, तरी मृत्यूसंख्या चिंताजनक बाब बनली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये मृत्यूदराविषयी चिंता जागवली जाते. अधिकाधिक कडक उपाययोजना करण्याच्या घोषणा होत आहेत. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे, परंतु मृत्यूदर कमी होत नाही.
दुसऱया लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. सध्या जिह्यात एक लाखावर असणाऱया रुग्णसंख्येत नगरपालिका तसेच शहरी भागात 14 हजार 500च्या वर रुग्ण आहेत, तर सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 26 हजारांपर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागात रुग्णांचा आकडा 61 हजारांच्या पुढे गेला आहे.
37 डॉक्टरांच्या सातारा, सिंधुदुर्गला बदल्या
n ऐन कोरोना संकटाच्या काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने काढले आहेत. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित असल्याने या डॉक्टरांच्या बदल्या झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. साताऱयात 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश होतील त्यासाठी 510 पदे भरली जाणार आहेत.

























































