
पुणे शहरातील विविध भागात असलेल्या मंदीरातील दानपेट्यांमधील रोकड चोरून नेण्याचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. श्री जैन मंदीरातील चोरीची घटना ताजी असताना चोरट्यांनी शुक्रवार पेठेतील गणेश मंदीरासह दोन मंदीरातून दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी कौस्तुभ राजेंद्र देशमुख (वय 27) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शुक्रवार पेठेतील गणेश मंदीराचे शटर उचकटून चोरट्यांनी मंदीरातील दानपेटीचे झाकण उघडून 800 रूपयांची चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी सुभाषनगर परिसरातील आचार्य अत्रे सभागृहानजीक असलेल्या मंदीरातील दानपेटीतील पैसे चोरून नेले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करीत आहेत.
























































