भूषणला लागली वाचनाची गोडी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. चित्रपट, मालिकांच्या शूटिंग बंद असल्याने मिळालेल्या निवांत वेळेत कलाकार आपल्या आवडीनिवडी जपतायत, नवनवीन गोष्टी शिकतायत. याच दिवसांत अभिनेता भूषण प्रधानला पुस्तक वाचनाची गोडी लागलीय.

‘अखेर नियमित वाचनाची सवय लागली,’’ असे म्हणत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलीय. पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय, ‘‘गेल्या काही आठवडय़ांत आईने आणि मी मिळून जवळपास 5 ते 6 पुस्तके वाचली. आता ही रोजची सवय झालीय. सवय आणि आवडही.’’  पुढे तो म्हणाला, ‘‘तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर तुम्हाला अजून योग्य पुस्तक सापडले नाही, असे जे.के. रोलिंग यांनी म्हटले आहे. वाचनाच्या सवयीबद्दल आणि आम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दल बरेच काही सांगायचे  आहे… लवकरच!’’