वर्सोव्यातील कोळीबांधवांना न्याय मिळवून देणार! खासदार गजानन कीर्तिकरांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोळी बांधांना वादळानंतरच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व्हावे, डिझेल परतावा, एलईडी लाइट मच्छीमारी रोखणे यासंदर्भातील विविध प्रश्नांबाबत शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी वर्सेवा कोळीवाडा येथे भेट दिली. वर्सेव्यातील कोळीबांधवांच्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करून त्यांना न्याय देणार, असे आश्वासन यावेळी गजानन कीर्तिकर यांनी दिले.

वर्सेव्यातील कोळी बांधवांच्या समस्या खासदार कीर्तिकर यांनी ऐकून घेतल्या व सदर कोळी बांधवांना सर्व तक्रारी लिखीत स्वरूपात देण्यासंबंधी सूचना दिल्या व त्यानंतर कोळी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारे पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले. तौकते वादळाच्या पार्श्वभूमीवर वर्सेवा गावातील कोळी बांधवांच्या रोजीरोटी असलेल्या बोटींच्या परिस्थितीची व बंदराची पहाणी करण्यासाठी खासदार गजानन कीर्तिकर हे तहसिलदार सचिन भालेराव, फिशरिजचे अधिकारी शांता शिंतुरे, गजानन बुंदेले यांच्यासमवेत बंदरावर आले. त्यावेळी शिवसेना महिला संघटक व आरोग्य समिती अध्यक्षा राजूलताई पटेल, विधानसभा संघटक शैलेश फणसे, उपविभाग प्रमुख राजेश शेटय़े, स्थानिक नगरसेविका व बाजार उद्यान समिती अध्यक्षा सौ प्रतिमा खोपडे, उपविभाग संघटक सौ जागृती भानजी, श्रीमती रंजना पाटील, शाखाप्रमुख सतिश परब, म. आ. शाखा संघटक बेबीताई पाटील, वेसावा मच्छीमार विविध सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी देवेंद्र काळे, पराग भावे, संदिप भानजी, नारायण कोळी, आदी कोळी बांधव गाऱहाणे मांडण्यासाठी उपस्थित होते.