लडाखमधील गावाचा चेहरामोहरा बदलला, नेहाने लंडनची नोकरी सोडून उभारलं इको व्हिलेज मॉडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनची नोकरी सोडून हिंदुस्थानात परतलेल्या नेहा उपाध्याय या 35 वर्षीय तरुणीने लडाखच्या गावात इको व्हिलेज ही संकल्पना यशस्वी करून दाखवली आहे. नेहाने अवघ्या काही वर्षांत तकमाचिक गावाचं रुपडं पालटलं आहे. गावातील शेतकऱयांनी पूर्णपणे नैसर्गिक अन् सेंद्रीय शेतीची कास धरली आहे. आरोग्यापासून रोजगारापर्यंत हे गाव स्वयंपूर्ण झाले आहे.

बिहारच्या पश्चिम चंपारण्य भागात राहणारी नेहा उपाध्याय शेतकरी कुटुंबातील आहे. लंडन येथून मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर तिथल्याच शाळेत रिसर्च ऑफिसर म्हणून तिने दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर ती हिंदुस्थानात परतली. लडाखमधील शेतकऱयांना हाताशी धरून तिने इको व्हिलेज मॉडेल विकसित केले. असे गाव जिथे, गावकऱयांना कामाच्या शोधात बाहेर जावे लागणार नाही. गावातच रोजगार उपलब्ध होईल.

लडाखच्या तकमाचिक गावातून नेहाने कामाला सुरुवात केली. नेहाने सर्वप्रथम तकमाचिक गावातील शेतकऱयांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण दिले. फळ प्रक्रिया युनिट लावले. सोलर ड्रायर व अन्य साधने उपलब्ध करून दिली. शेतकऱयांनी पिकवलेल्या अक्रोड, बदाम, मशरूम आदी उत्पादनांना मार्पेटपर्यंत नेण्यासाठी 2015 साली स्टार्टअप सुरू केले. सद्यस्थितीत 650 शेतकरी या मॉडेलशी जोडले गेले आहेत.

सहा गावांत यशस्वी प्रयोग

इको व्हिलेज मॉडेलचा प्रयोग सहा गावांत सुरू आहे. स्थानिक शेतकरी फळांचे उत्पादन घेतात. त्याच्या मार्पेटिंगचे काम नेहा आणि तिची टीम करते. दिल्लीतील मोठमोठी दुकाने आणि वेबसाईटवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरदेखील विक्री होते. ज्या उत्पादनांसाठी 200 रुपये मिळत नव्हते तिथे आता 400-500 रुपये मिळतात. तकमाचिक गावात आधी फक्त 29 कुटुंबं राहायची, तिथे आता 75 कुटुंबं राहत आहेत. लवकरच उत्तर प्रदेश आणि बिहार येथील गावांमध्ये इको व्हिलेज मॉडेल राबवणार असल्याचे नेहाने सांगितले.