सोशल मीडियावरील पहिल्या पोस्टची होतेय चर्चा! 1989 साली चार महिलांचा फोटो केला होता अपलोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या देशात फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंदीची चर्चा सुरू आहे. अशातच सोशल मीडिया नसेल तर आपले आयुष्य कसे असेल, हा प्रश्न लोकांना पडला आहे. सर्वात पहिली सोशल मीडिया साईट कोणती होती आणि सर्वात पहिली पोस्ट कोणती होती, याबाबतही विचारणा सुरू झाली आहे. याचे उत्तर म्हणजे 1989 साली अपलोड झालेला चार महिलांचा फोटो ही पहिली पोस्ट होती. स्वित्झलँडमध्ये प्रसिद्ध असलेल्या सर्न या लॅबोरेटरीचे कॉम्प्युटर तज्ञ सिल्वानो जे गेन्नारो यांनी आपल्या ऑफिसमध्ये एका संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चार महिला स्टेजवर चढून गाणे म्हणत होत्या. त्यांचा फोटो काढण्यात आला होता. सिल्वानो यांनी लॅबोरेटरीची वेबसाईट बनवून हा फोटो तिथे पोस्ट केला. असं म्हटलं जातं की, हीच जगातील पहिली पोस्ट आहे.

सिक्स डिग्रीज ठरली पहिली सोशल नेटवर्पिंग साईट

पहिल्या सोशल मीडिया साईटचे नाव ‘सिक्स डिग्रीज’ असे होते. या साईट्सची निर्मिती 1997 साली झाली होती. ही ब्लॉगिंग साईट होती. त्यावर व्यक्ती आपले फोटो अपलोड करू शकत होते आणि दुसऱया युजरला आपला फ्रंड बनवू शकत होते.