चीनविरोधात अमेरिकेच्या गुप्तचरांकडे ठोस पुरावे, ‘डबल्यूएचओ’ही जाळय़ात अडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला चीननेच जन्माला घातल्याचे अवघ्या जगाला पुराव्यानिशी पटवून देण्याचा निर्धार अमेरिकेने केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा प्रचंड सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्याकडे चीनविरोधात काही ठोस पुरावे आहेत. त्यामुळे चीनचा खरा ’पापी’ चेहरा समोर येणार असून जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) दुटप्पी भूमिकाही चव्हाटय़ावर येणार आहे.

  • गेल्यावर्षी कोरोना उत्पत्तीच्या चौकशीला सामोरे जाण्यास चीनने तडक नकार दिला होता. नंतर डब्ल्यूएचओच्या चौकशीला तयारी दाखवली. मात्र त्यावेळीही चौकशी पथकात स्वतःचे 13 तज्ञ ठेवण्यासाठी दबाव आणला. ‘सार्स’ विषाणूसुद्धा चीनचेच कर्म असल्याचा संशय आहे.
  • जेव्हा जेव्हा कोरोनाबाबत चौकशीचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा चीन मागे लपून राहत आहे.
  • अमेरिकेच्या ‘सीएनएन’ने गेल्या वर्षी मोठा खुलासा केला होता. मीट मार्केटमधून कोरोना पसरल्याचा चीनचा दावा चुकीचा आहे. विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतूनच पसरल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले होते.

डब्ल्यूएचओची भूमिका संशयास्पद

डब्ल्यूएचओचा अहवाल मार्चमध्ये प्रसिद्ध झाला. एकूण 313 पानी अहवालातून काही ठोस निष्कर्ष पुढे आले नाहीत. चीनच्या प्रयोगशाळेतच कोरोनाची निर्मिती झाली, असा आरोप जगभरातून होत आहे. मात्र डब्ल्यूएचओने प्रयोगशाळेचा अहवाल अवघ्या 4 पानांमध्ये गुंडाळला होता.