सलाम रॉकी भाई! चित्रपटसृष्टीतील कामगारांना अभिनेता यशचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केजीएफ’ या चित्रपटातला ‘रॉकी भाई’ म्हणजेच साऊथ सुपरस्टार यश चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱया कलाकारांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कोरोनाच्या या संकटात काम नसल्याने चित्रपटसृष्टीतील रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांचे हाल झाले आहेत. अशाच कन्नड चित्रपटसृष्टीतील तब्बल 3 हजार कामगारांच्या मदतीसाठी त्याने नुकतेच दीड कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक कामगाराच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. यशने इन्स्टाग्राम पोस्टवरून याबाबत माहिती दिली आहे. या कठीण परिस्थितीत ही मदत फार मोठी नाही. पण हा आशेचा किरण आहे. येणारा काळ चांगला असेल अशी आशा आहे, असे त्याने म्हटले आहे.