
इस्रायलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. गेली 12 वर्षे पंतप्रधान असलेले बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध आठ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी प्रयोग केला आहे. त्यामुळे नेतान्याहू यांची गच्छंती अटळ आहे. अवघे सात खासदार असलेले नेफ्टाली बेनेट हे इस्रायलचे नवीन आघाडी सरकारचे पंतप्रधान असणार आहेत.
इस्त्र्ाायल-पॅलेस्टाइ्न संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे राजकीय बदल होत आहेत. इस्त्र्ाायलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांच्या काळात देशात अस्थिरता वाढल्याचा आरोप आहे. 120 खासदार असलेल्या इस्त्र्ाायली संसदेत नेतान्याहू यांना बहूमत नाही. 2019 पासून तब्बल चार वेळा निवडणुका झाल्या तरी बहुमत मिळाले नाही. बहुमत सिद्ध करण्याची मुदत बुधवारी रात्री 12ला संपणार होती. तत्पूर्वी अर्धा तास आधी विरोधी पक्षांच्या आघाडीवर एकमत झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना देण्यात आले. पुढील आठवडय़ात नेफ्टाली बेनेट हे संसदेत बहूमत सिद्ध करतील आणि पंतप्रधानपदाचा कारभार घेतील.
इसाक हार्जोग नवे राष्ट्रपती
इस्त्रायली संसद नेसेटमध्ये आज गुप्त मतदान झाले. त्यात लेबर पक्षाचे नेते हार्जोग यांची 11वे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील सियाम हार्जोग हे 1983 ते 93 राष्ट्रपती होते.
लेफ्ट-राईट पक्ष एकत्र; दोन-दोन वर्षे पंतप्रधानपद
या आघाडीत डावे आणि उजव्या विचारांचे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. नेफ्टाली बेनेट यांच्या पक्षाचे अवघे सात खासदार आहेत. ते 2023 पर्यंत पंतप्रधानपदी असतील. त्यानंतर विद्यमान विरोधी पक्षनेते एटिड पक्षाचे याइर लॉपेड हे पंतप्रधान असतील.



























































