चित्रपटाचा हिरो पाहून प्रसिद्ध अभिनेत्रीला बसला धक्का, त्यानंतर पूर्ण करिअरच बोंबलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेत्री ग्रेसी सिंह हिने तिच्या करिअरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर छोट्या मोठ्या भूमिका करत असतानाच अचानक ती मोठ्या पडद्यावर झळकली ते देखील सुपरस्टार आमीर खान सोबत. त्यांचा चित्रपटही सुपरहिट झाला. ग्रेसी सिंगच्या अभिनयाचेही कौतुक झाले. त्यानंतर अनिल कपूर, संजय दत्त आणि अजय देवगण अशा मोठ्या स्टार सोबत तिने सुपर हिट चित्रपट दिले. त्यानंतर मात्र ग्रेसी सिंगची पिछेहाट झाली.

gracy-singh-lagaan

 काही वर्षांनी ती कमाल आर खानच्या देशद्रोही चित्रपटामध्ये दिसली आणि अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. एवढ्या मोठ्या मोठ्या सुपरस्टारसोबत काम करणारी ग्रेसी या चित्रपटात कशी? हा प्रश्न चाहत्यांना पडला.त्यानंतर ग्रेसी सिंह चित्रपटसृष्टीतून एकएकी गायब झाली. तिच्या करिअरची पिछेहाट कशी झाली? ती एकाएकी का गायब झाली असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

gracy-iskon-1

नृत्य कलाकार

ग्रेसी सिंह ही मूळची दिल्लीची. तिचा स्वभाव थोडासा लाजरा. पण तिला नृत्याची मोठी आवड होती. कॉलेज मध्ये असताना तिने अनेक परफॉर्मन्स दिले होते. तिला अभियनयात बिलकूल रस नव्हता. अशीच एकदा परफॉर्मन्स दिल्यानंतर एका वरिष्ठ मेकअपमनची तिच्यावर नजर पडली आणि तु अभिनय का नाही करत असा प्रश्न त्यांनी विचारला. पण आपल्याला त्या क्षेत्रात फार रस नसल्याचे तिने सांगितले. तसेच अभिनय क्षेत्रात आपली ओळखही नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा मेकअप आर्टिस्टने ग्रेसीची ओळख संजीव भट्टाचार्य यांच्याशी करून दिली. संजीव भट्टाचार्य हे टीव्ही विश्वातले मोठे आसामी होते. तेव्हा ते अमानत नावाची मालिका निर्मित आणि दिग्दर्शित करत होते. भट्टाचार्य यांनी ग्रेसीला अमानत मालिकेत डिंकीची भुमिका दिली होती. ग्रेसीला व्यवस्थित अभिनय येत नसल्याने सुरूवातीला तिला कमी संवाद दिले जात होते. नंतर जेव्हा ग्रेसी अभिनयात रुळली तेव्हा तिला जास्त संवाद आणि सीन देण्यात आले.

amanat-gracy

लगानची बाजी

आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान एक चित्रपट बनवत होते. पण हा चित्रपट गुजरातमधील भुज गावात चित्रित होणार होता. या चित्रपटासाठी राणी मुखर्जी आणि सोनाली बेंद्रे या दोघींची नावे पुढे आली होती. परंतु काही कारणस्तव बारगळली. नंतर ग्रेसीने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि ती सिलेक्ट झाली. लगान असे या चित्रपटाचे नाव. या चित्रपटातील भुमिकेमुळे ग्रेसीची खूप वाहवा झाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे दार तिच्यासाठी खुले झाले.

lagaan-grracy

मुन्नाभाई आणि गंगाजल

त्यानंतर ग्रेसीला मोठमोठ्या चित्रपटाचे ऑफर्स येत होते. त्यापैकी मुन्नाभाई एमबीबीएस आणि गंगाजल हे दोन चित्रपट तिने साईन केले. दोन्ही चित्रपट चांगलेच चालले. अशा वेळी ग्रेसीला अनेक ऑफर्स येत होत्या. ग्रेसी सिंह एकाच वेळी तीन ते चार चित्रपटात काम करत होती. पण त्यापैकी अनेक चित्रपट पूर्ण झाले नाही, जे पूर्ण झाले ते प्रदर्शित झाले नाहीत आणि जे प्रदर्शित झाले ते जोरदार आपटले. करिअरच्या शिखरावर असतानाच ग्रेसीला बॉलिवूडमध्ये अपयश येत होते.

त्यानंतर ग्रेसी सिंहने आपले करीअर सुधरण्यासाठी अनेक प्रादेशित चित्रपटांत काम केले त्यात तमिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी आणि बंगाली चित्रपटांचा समावेश होता.

gracy-deshdroh

केआरके मुळे संपले करीअर

ग्रेसी सिंह जेव्हा प्रादेशिक चित्रपट करून आपले करीअर उभे करू पाहत होती, तेव्हा तिला देशद्रोही नावाच्या चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटाची निर्मिती कमाल आर खान करत होता. नंतर ग्रेसीला कळाले की कमाल खानच या चित्रपटाचा हिरो आहे. जेव्हा ग्रेसीला हे कळाले तेव्हा खूप उशीर झाला होता. आणि मध्येच चित्रपट सोडने तिला योग्य वाटत नव्हते. पण ग्रेसीने हा चित्रपट केला आणि तिचे बॉलिवूडमधील करीअर संपल्यात जमा झाले. त्यानंतर ग्रेसीला कुठल्याच हिंदी चित्रपटात संधी मिळाली नाही. तिने अनेक प्रादेशिक सिनेमांत काम सुरू ठेवले. ग्रेसीने मराठीत आंधळा डॉक्टर या चित्रपटातही काम केले.

ग्रेसी सिंहचे मॅनेजर होते आर जोशी. जोशी ग्रेसीसाठी योग्य चित्रपट निवडायचे, चित्रपट आणि स्क्रिप्ट निवडण्यात जोशी यांची ग्रेसीला खूप मदत व्हायची. पण जोशी यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रेसीच्या करीअरला उतरती कळा लागली.

gracy-iskon-2

अभिनय आपले लक्ष्य नसल्याचे ग्रेसीने सांगितले. ग्रेसीला शास्त्रीय नृत्यात रस होता, आपला स्वतःचा डान्स ग्रुप असावा असे तिचे स्वप्न होते. त्याप्रमाणे ग्रेसीने स्वतःचा ग्रुप बनवला असून अनेक ठिकाणी तिच्या शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम होतात.