
महाराष्ट्राचे नवनाथ ढमाळ यांची उद्यापासून (8 ते 13 जून) पोलंड येथील वारसा येथे खेळवण्यात येणाऱया जागतिक क्रमवारी कुस्ती स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. नवनाथ ढमाळ हे जागतिक कुस्ती संघटनेचे अधिकृत पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी केलेली आहे. नवनाथ ढमाळ हे खंडाळा येथील आसवली गावातील रहिवासी आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, बंकट यादव, ललित लांडगे, दिनेश गुंड, दिलीप पवार व आसवली ग्रामस्थांनी नवनाथ ढमाळ यांचे अभिनंदन केले.
























































