गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवले. बऱयाच जणांनी तर संकटात संधी शोधून आयुष्याला नवी दिशा दिली. ओडिशा राज्यातील अरुण साहू या कलाकारानेही अशीच काैतुकास्पद कामगिरी केलीय. साहू यांनी अत्यंत कलापुसरीने लाकडापासून पुस्तक बनवले आणि त्या पुस्तकात ‘हनुमान चालिसा’ कोरून लिहिली आहे.
अरुण साहू हे गंजम जिह्याच्या कांटेई कोली गावात राहतात. ते सुतारकाम करतात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांनी लाकडातून अनेक कलाकृती साकारल्या. त्यांना पुरस्कारदेखील मिळाले. त्यामुळे त्यांना उत्साह वाढला. यापेक्षा आणखी काय वेगळे करता येईल, या विचारातून साहू यांना अनोख्या पद्धतीने ‘हनुमान चालिसा’ साकारण्याची कल्पना सुचली. त्यानंतर या वर्षी त्यांनी लाकडावर हिंदी अक्षरे कोरून त्यातून हनुमान चालिसा लिहिली आहे.
- गंजम जिह्यात मिनी म्युझियम साकारावे, अशी अरुण साहू यांची इच्छा आहे. देशातील मंदिरे आणि विविध ठिकाणे यांच्या लाकडी कोरीव काम प्रतिकृती म्युझियममध्ये ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.





























































