कांदळवनाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील कांदळवन क्षेत्र सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे आहे. त्यांच्या  संरक्षणासाठी अतिरिक्त मनुष्यबळासोबतच सीसीटीव्हीसह अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज  दिल्या.

या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, कांदळवनचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी, मुख्य वन संरक्षक अरविंद आपटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन संरक्षक मल्लिकार्जुन, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, कांदळवनचे उप वन संरक्षक निनू सोम राज, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे आदी उपस्थित होते.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान बैठक

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य प्राण्यांकरिता कोअर क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या दृष्टीने चंद्रपूर आणि शिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आदेशही आदित्य ठाकरे यांनी दिले.