बॉलिवूडचे ‘हिमॅन’ करतायत वॉटर एरोबिक्स, धर्मेंद यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे ‘हिमॅन’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपल्या अभिनयासोबत फिटनेसमुळेदेखील चर्चेत असतात. सध्या ते बॉलिवूडपासून दूर असून आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर  सेंद्रिय शेती करतायत. 85 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते स्विमिंग पूलमध्ये वॉटर एरोबिक्स करताना दिसतायत.

कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘‘मित्रांनो, परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे योग आणि हलक्या व्यायाम प्रकारांसह नुकतीच मी वॉटर एरोबिक्सला सुरुवात केली आहे. उत्तम आरोग्य हे आयुष्यासाठी खूप मोठे वरदान आहे. सगळ्यांनी आनंदी आणि निरोगी राहा.’’ त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी त्यांच्या फिटनेसचे काwतुक केले आहे. आगामी काळात धर्मेंद्र ‘अपने-2’ या चित्रपटात झळकणार आहेत. यात देओल कुटुंबाच्या तीन पिढय़ा एकत्र काम करताना दिसणार आहेत.