
राम मंदिरासाठी भक्तांनी भरभरून दान दिले आहे. ट्रस्ट कडे हजारो कोटी रुपये जमा झाले असून मंदिराचे काम जोरात सुरू आहे. नुकतंच ट्रस्टने स्टेट बँकेत 500 कोटी रुपयांची फिक्स डिपॉजिट सुरु केली आहे. त्यातील मिळणार्या व्याजाची रक्कम मंदिरासाठी वापरण्यात येणार आहे.
राम मंदिर ट्रस्टने नुकतंच अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत 500 कोटींची फिक्स डीपॉजिट सुरू केली आहे. ही रक्कम एकूण मिळालेल्या दानपैकी 10 टक्के इतकी आहे. म्हणजेच आतापर्यंत ट्रस्टला राम भक्तांकडून 5 हजार कोटी रुपये दान मिळाले आहेत. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसर स्टेट बँकेत 500 कोटींची फिक्स डीपॉजिट करण्यात आली आहे. हे पैसे जर करंट अकाऊंटमध्ये ठेवले असते तर त्याचे व्याज मिळाले नसते. म्हणून त्याची एफ़डी करण्यात आली आहे. या एफ़डीमधून ट्रस्टला चांगले व्याज मिळाले आणि त्या रकमेचा वापर मंदिरासाठी करण्यात येईल.
15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण देशात निधी गोळा करण्यासाठी अभियान राबवण्यात आले होते. अनेक मुस्लिम नागरिक आणि संघटनांनीही राम मंदिरासाठी पैसे दिले होते.




























































