दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अर्जुन विजय राठोड (वय 19) , शिवराज खेमचंद मेघावत (वय 19) आणि प्रितम प्रकाश गायकवाड (वय 19, सर्व रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमंलदार प्रकाश शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी आंबेगाव पठार परिसरातील पवार फर्निचर गल्लीत पाचजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवत विचारणा केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही शस्त्रे आढळून आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.