
लग्नानंतरच्या गोड आठवणी खरंतर प्रत्येक जोडप्यासाठी आनंददायी असतात. पण, हीच आठवण काहींना आयुष्यभराचं दुःख देऊन जाते. अशीच एक घटना एका जोडप्यासोबत घडली आहे.
फुकट बर्गर न दिल्याने 19 जणांना अटक, लाहोर पोलिसांच्या कारनाम्याची जगभर चर्चा
ब्राझीलमधील इबिराईट शहरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका जोडप्याच्या लग्नाची पहिली रात्र वधूच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री शारीरिक संबंधांदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
मी दहशतवादी नाही तर मूर्ख होते! जिहादी वधूची खळबळजनक मुलाखत
या 18 वर्षांच्या तरुणीचा विवाह 29 वर्षांच्या तरुणाशी झाला होता. रात्री शारीरिक संबंधांदरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं.
चौकार वाचवताना डोकं आपटलं, मैदानातील अपघातामुळे फाफ ड्यु प्लेसिसला स्मृतिभ्रंश
शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचं निष्पन्न झालं. पण, तिला ब्राँकायटिसचा त्रास होता. या आजारात श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे फुफ्फुसांना प्राणवायू मिळण्यास अडथळा होतो. जर यांना सूज आली तर फुफ्फुसांमध्ये कफ जमा होतो. याच त्रासामुळे या तरुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.




























































