
नगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीबाबत आज मुंबईत झालेल्या बैठकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रितपणे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेल्याची माहिती शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली.
नगर महापालिकेच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठका पार पडल्या.























































