संजय जाधव पहिल्यांदा करणार वेबसिरीजचे दिग्दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आता ‘अनुराधा’ या नव्याकोऱया वेब सिरीजची घोषणा केली आहे. या वेबसिरीजचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. संजय जाधव यानिमित्ताने प्रथमच वेबसिरीजचे दिग्दर्शन करत आहेत. यात तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

वेब सिरीजबद्दल दिग्दर्शक संजय जाधव सांगतात, ‘‘ही एक सस्पेन्स थ्रिलर असून माझ्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे तो म्हणजे माझी पहिली वेब सिरीज ‘प्लॅनेट मराठी’सारख्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.  अनुराधामधील प्रत्येक कलाकार हा उत्कृष्ट अभिनय करणारा आहे.’’