पुण्यात बसप्रवासात तरूणाची सोनसाखळी चोरली, तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसने पुणे स्टेशन ते वाघोली असा प्रवास करणाऱय़ा तरूणाच्या खिशातील पाकिटातून रोकड व सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी प्रविण काजळे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजळे हे शुक्रवारी सकाळी वाघोली ते पुणे स्टेशन पीएमपीएल बसमधून प्रवास करत होते. विमाननगर चौकाजवळ बस आल्यानंतर त्यांना खिशातील पाकीटामध्ये असलेली सोन्याची साखळी, 2 हजार रूपये चोरीला गेल्याचे आढळून आले. काजळे यांचा एकूण 47 हजार रुप्यांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यांनी तत्काळ विमानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर शहरात पीएमपीएल बस सुरू करण्यात आल्या आहेत. बस सुरू झाल्यानंतर पुन्हा प्रवासादम्यान नागरिकांचा ऐवज चोरीचे प्रकार घडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.