दोन महिन्यांत राज्याचे लसीकरण पूर्ण होईल! दिवसाला 15 लाख लोकांच्या लसीकरणाची क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे अवघ्या जगाला पटले आहे. केंद्र सरकारनेही देशातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. डिसेंबर आधी सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातही दोन महिन्यांत सर्वांचे लसीकरण होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यापुढे अॅण्टीजन टेस्टनुसार नाही तर आरटीपीसीआर टेस्टनुसारच पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात येणार आहे.सध्या लावण्यात आलेले निर्बंध हे फार साधारण असून ते गरजेचे आहेत म्हणूनच लावले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली की योग्य निर्णय घेऊ, असे टोपे म्हणाले.

दिवसाला 10 ते 15 लाख लोकांच्या लसीकरणाची राज्याची क्षमता आहे. मात्र केंद्राने सतत लस पुरवायला हवी, असे टोपे म्हणाले.