क्यूआर कोड दाखवा, रेल्वे पास मिळवा, युनिव्हर्सल ट्रव्हल पासशिवाय प्रवासाला मनाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना निर्बंध लागू असतानाही सध्या मध्य रेल्वेतून दररोज 18 लाख तर पश्चिम रेल्वेतून 11 ते 12 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. यातील निम्म्याहून अधिकांचा प्रवास हा बोगस ओळखपत्रावर सुरू असल्याने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून युनिव्हर्सल ट्रव्हल पास देण्यात येणार आहे. यासाठी दिलेल्या वेबसाईटवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर क्यूआर कोड येणार आहे तो क्यूआर कोड दाखविल्याशिवाय रेल्वे पास किंवा तिकिट मिळणार नाही.

ओळखपत्र कसे मिळेल?

  • युनिव्हर्सल ट्रव्हल पाससाठी https://epassmsdma. mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्थळावर अत्यावश्यक सेवेतील परवानगी असलेल्या सर्व आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी लागणार आहे.
  • या कर्मचाऱ्यांच्या सत्यतेची पडताळणी संबंधित प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.
  •  या वेबसाइटवर मोबाईल नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाइप केल्यानंतर कर्मचाऱ्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर फोटोसह आयडी डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल.