मौजमजेसाठी चोरल्या 8 दुचाकी, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मौजमजा करण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शाहवेज शहजाद अन्सारी (वय 25, रा. कॅम्प, मूळ- उत्तरप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरातील ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणारा कॅम्प परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे आणि ऋषिकेश ताकवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून शाहवेजला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वानवडी, लोणीकंद, कोंढवा, शिक्रापूर, तोफखाना, नगर, सुपा, नगर, हडपसर परिसरातून 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार,ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.