कोल्हापुरातील दुकाने उघडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, आज आक्रमक झालेल्या व्यापारी संघटनांनी सरसकट सर्वच दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकाऱयांमध्ये झालेल्या चर्चेतून आणखी दोन दिवस दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचा निर्णय झाला.

गेल्या 80 दिवसांपासून दुकाने बंद असल्याने दुकानांतील माल खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. कामगार आणि मालकवर्गाचेही हाल होत असल्याने आजपासून सरसकट सर्वच दुकाने उघडण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला होता. संघटनेच्या पदाधिकाऱयांनी व्यापारपेठेत फिरून व्यापाऱयांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला. याच वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱयांची पोलीस मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. व्यापाऱयांनी आपल्या व्यथा मांडल्या.

दरम्यान, पुण्याप्रमाणे कोल्हापूर, इचलकरंजी शहर व ग्रामीण अशा दोन भागांत विभागणी करून सर्वच दुकाने उघडण्यास शासनाकडून परवानगी घेता येईल. जिल्हाधिकाऱयांसोबत चर्चा करून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू. यासाठी आणखी दोन दिवस व्यापाऱयांनी दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत केली. त्यामुळे व्यापाऱयांनी दुकाने पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

निर्णय न झाल्यास दुकाने उघडणारच!

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव माहीत असल्याने गेले 80-82 दिवस गप्प बसलो. व्यापाऱयांचे खूप नुकसान होत आहे. आणखी काही दिवस दुकाने बंद राहिली तर कोटय़वधींचे नुकसान होणार आहे. पोलिसांच्या विनंतीमुळे दोन दिवस दुकाने बंद ठेवून संयम बाळगत आहे. दोन दिवसांत कोणताही निर्णय झाला नाही तर सर्वच दुकाने उघडली जातील, असा इशारा कोल्हापूर चंबर ऑफ कामर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला.

टेस्ट वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

बाधितांची संख्या रोखण्यासाठी टेस्ट वाढविणे गरजेचे असल्याचा मुद्दा व्यापाऱयांनी मांडला. त्याला पोलीस प्रशासनाने होकार दिला आहे. टेस्ट वाढल्या तर रुग्ण सापडतील आणि त्यांच्यापासून होणारा संसर्ग कमी होईल. यासाठी आरोग्य विभागाशी चर्चा करून टेस्ट वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.