
नागपूर येथील हत्या प्रकरण ताजे असतानाच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद या गावी पुन्हा तिहेरी हत्याकांड घडल्यामुळे सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भामोद येथे एका इसमाने पत्नी व 16 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख (45) याने आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.




























































