संत ज्ञानेश्वर महाराज वारीनिमित्त थोरल्या पादुका मंदिरात महापूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी – पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत माऊलींचे पादुकांची प्रतिकात्मक महापुजा दही, दूधाचा व मधाचा अभिषेक, महापूजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माऊलीसह भगवान पांडुरंगाची आरती झाली.

मागील वर्षी माणे यावर्षीही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने माऊलींच्या पादुका पालखी वारीनिमित्त पंढरपूरला बसने नेण्यात येणार आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन संत श्रीच्या वैभवी पादुकांची महापूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार केली जाते. मात्र या वर्षी कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चल पादुका एस.टी. बसने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. त्यामुळे गेली 250 वर्षीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे श्रींची प्रतिकात्मक पूजा संत ज्ञानेश्वर महराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. माऊलींच्या चल पादुकांना अभिषेक सकाळी करण्यात आला. त्यानंतर आरती व महाप्रसादाचा महानेवेद्य दाखविण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ह.भ.प. रमेश घोंगडे, ह.भ.प. पप्पू ब्रम्हे काका, ह.भ.प. बाबूलाल तापकीर, सखाराम तापकीर आदी उपस्थित होते.