
वरळीतील डॉ. अॅनी बेझंट मार्गावरील उत्तर वाहिनीवरील लव्हग्रोव्ह उड्डाणपुलाचे नादुरुस्त बेअरिंग बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शनिवारी संध्याकाळपासून हाती घेतले आहे. त्यामुळे हे उड्डाणपूल शनिवार व रविवार वाहतुकीसाठी पूर्णता बंद राहणार आहे. दरम्यान, पहिला ट्रफिक ब्लॉक संपल्यावर सोमवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या उड्डाणपुलाचे 51 बेअरिंग बदलण्यात येणार असून सहा टप्प्यांत काम विभागले आहे. दर शनिवार व रविवारी काम हाती घेण्यात येइल.



























































