अभिनेत्रीच्या विनयभंगप्रकरणी मालिका अभिनेत्याला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्याने त्याच्या घरीच एका पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत त्याच्या काही निवडक मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी बोलावले होते. तेथे ती अभिनेत्री आली होती. पार्टीदरम्यान त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. घडल्याप्रकरणी अभिनेत्रीने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून रात्री उशिरा अभिनेत्याला अटक केली.























































