
जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाला उलट्या कोयत्याने मारहाण करीत विटांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास कर्वेनगरमधील सहवास सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी अभिषेक लोंढे (वय 28) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अभिषेक आणि त्यांचे मित्र ओंकार कोळी, वैभव गौडी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेउन दुचाकीवर वारजेतील दुधानेनगर परिसरात चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोळक्याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. जुन्या भांडणाच्या रागातून अभिषेकला आरोपींनी त्यांच्या गाडीवर बसवले. राजाराम पुलाजवळ नेऊन त्यांच्यावर उलट्या कोयत्याने वार केला. त्याशिवाय विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता पाटील तपास करीत आहेत.




























































