
लग्नसोहळा म्हटले की, पारंपरिक विधी, अंगतपंगत, रुखकत, आंदण आणि बरंच काही येतं. अशा पारंपरिक सोहळ्याला पर्यावरणपूरकतेची जोड देत हिंगोली येथे नुकताच अनोखा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात वधुपित्याने नवदांपत्याला 30 फळझाडे आंदण म्हणून दिली. पर्यावरण संवर्धनाचा आणि पुढच्या पिढय़ांचा विचार करून दिलेली ही खास भेट बघून नकदांपत्य हरखून गेले.
हिंगोली येथे अंकुशराव बुधवंत यांचा मुलगा अमरदीप यांचा विवाह संजय मुसळे यांची कन्या स्नेहा हिच्याशी झाला. या सोहळ्यात वधुपिता संजय मुसळे यांनी लेकीला आयुष्यभर पुरेल अशी भेट दिली. आंबा, चिंच, जांब, आवळा, चिकू, रामफळ, फणस, सीताफळ आदी फळझाडं त्यांनी लेकीच्या हाती दिली. लग्नात नवरीला आंदण देण्याची प्रथा आहे. मोठमोठय़ा महागडय़ा वस्तू मुलीला दिल्या जातात. त्यावरचा खर्च थोडा कमी करून त्या रकमेतून फळझाडे विकत घेऊन ती देण्यात आली. अगदी अशाच प्रकारचा लग्न सोहळा परभणी जिह्यात झाला. जिंतूर येथे गोविंद बुधवंत यांचा विवाह पूजा कांदे हिच्याशी झाला. या लग्नातही वधूवरांना फळझाडांची भेट देण्यात आली.
‘एक मूल तीस झाडे’ उपक्रमाबद्दल माहिती देताना अण्णासाहेब जगताप म्हणाले, ‘‘आपल्याकडे लग्नात झाडाला महत्त्क आहे. बोहल्याकर चढताना झाड लाकून जाणे, तुळशीला पाणी घालणे अशा प्रथा आहेत. झाडं सुख प्राप्त करून देतात, असं स्वंद पुराणात म्हटलेले आहे. पूर्की लग्नात गाय आंदण दिली जायची. तसंच झाडं दिली तर झाडं लावा असे कुणाला सांगायची वेळ येणार नाही. आपोआपच पर्यावरण संवर्धन होईल.’’
अशी एक-दोन नव्हे तर कित्येक पर्यावरणपूरक लग्नं मागील दोन-तीन वर्षांमध्ये परभणी, नांदेड, हिंगोली येथे पार पडली आहेत. ‘एक मूल तीस झाडे’ या अभियानांतर्गत असे आगळेवेगळे लग्न सोहळे पार पडत आहेत. नवदांपत्यांनी भेट मिळालेली फळझाडे शेतात लावायची. त्यांचे संगोपन करायचे. खरंतर ही लग्नातील एक खास आठकण असते. भविष्यात त्यातून उत्पादनही मिळते.






















































