ऍमेझॉनला चूक पडली महागात; 96 हजारांचा एसी विकला 5900 रुपयांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅमेझॉन कंपनीने आपल्या ई-कॉमर्स वेबसाईटवर आज मोठी चूक केली. अॅमेझॉनने साधारण एक लाख रुपये किमतीचा तोशिबाचा एसी अवघ्या 5900 रुपयांमध्ये विक्रीला उपलब्ध करून दिला. कंपनीला आपली चूक समजेपर्यंत अनेक लोकांनी एसी खरेदी केला.

अॅमेझॉनने जपानच्या तोशिबा कंपनीचा जो एसी लिस्टेट केला होता त्याची मूळ किंमत 96 हजार 700 रुपये आहे. मात्र त्याऐवजी 94 टक्के डिस्काऊंट देत अॅमेझॉनने त्याला 5900 रुपयांमध्ये ‘लिस्ट’ केले. म्हणजे चक्क 90 हजार 800 रुपयांचे डिस्काऊंट देण्यात आले. या ऑफरमध्ये 278 रुपयांचा मासिक हप्ताही दाखवण्यात आला. अॅमेझॉनच्या कित्येक ग्राहकांच्या ही चूक लक्षात आली. त्यांनी संधीचा फायदा उचलत एसीची खरेदी केली. 2019 साली अॅमेझॉनवर अशीच मोठी गडबड झाली होती. त्या वेळी 9 लाख रुपयांचा डीएसएलआर कॅमेरादेखील अवघ्या 6500 रुपयांत ऑनलाईन विक्रीला आला होता.