
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली आहे. गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशीरा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सुरक्षा दलाने या संपूर्ण भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली.
J&K | An encounter has started at Puchal area of Pulwama. Police and security forces are on the job. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) July 7, 2021
तेव्हा एका घरात लपललेल्या दहशतवाद्याने सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते, परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. अखेर सुरक्षा दलानेही उत्तरादाखल गोळीबार सुरू केला आणि चमक उडाली. रात्रभर या भागात गोळीबार सुरू होता.
या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यापूर्वी हंदवाडामध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन ठार झाला होता. गेल्या 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.



























































