
टीव्हीच्या इतिहासात एक वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस या शोच्या पुढच्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. दरवेळी काहीतरी वेगळी थीम असणारा हा शो यावेळी कसा असेल याची उत्सुकताही ताणली गेली होती.
आता ही उत्सुकता काहीशी शमली आहे, कारण बिग बॉसच्या 15व्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. पण, या सिझनच्या निमित्ताने शो मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

सर्वात पहिला बदल म्हणजे हा शो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. मराठी बिग बॉसच्या नंतर हा शो प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा शो पुढच्या वर्षी टेलिकास्ट होईल.
यातला पुढचा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे हा शो आता काही आठवड्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. जवळपास सहा आठवडे हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकेल.
त्यावेळी प्रेक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. या शोमध्ये स्पर्धकांचा शोमध्ये राहण्याचा कालावधी, त्यांना दिले जाणारे टास्क आणि एलिमिनेशन हे प्रेक्षक ठरवू शकणार आहेत.




























































