Video – “मैने खुद ये शहादत चुनी है” हिंदुस्थान पाकिस्तान युद्धावर आधारित भुजचा टीझर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1971 च्या हिंदुस्थान पाकिस्तान युद्धावर भुज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची यात प्रमुख भुमिका असून त्यात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही तसेच शरद केळकर यांचीही भुमिका आहे.

1971 साली हिंदुस्थान पाकिस्तानचे युद्ध झाले होते. तेव्हा पाकिस्तानने गुजरातमधील भुज येथील हवाई दलाचे तळ उध्वस्त केले होते. तेव्हा हवाई दलाचे अधिकारी विजय कर्णिक यांनी भूजमधील स्थानिक 300 महिलांच्या साथीने हे तळ पुर्नस्थापित केले होते. त्यामुळे संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण झाली होती. तसेच हे युद्ध हिंदुस्थानने जिंकलेली होती. या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

>

गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे या चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अखेर या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून 13 ऑगस्ट रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.