
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, योग्य त्या शेअरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच यात जोखीमही जास्त असते. त्यामुळे अनेकजण म्यूचुअल फंडचा पर्याय निवडतात. म्यूचअल फंडमध्ये एसआयपीद्वारे महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक करता येते. गेल्या काही वर्षात म्यूचुअल फंडच्या एसआयपी हा गुतंवणुकीसाठी चांगला पर्याय ठरत आहेत. गेल्या पाच वर्षात या सात म्यूचुअल फंडाच्या एसआयपींनी गुतंवणूकदारांना 30 टक्क्यांपर्यंतचा फायदा दिला आहे.
एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात एकरकमी पैसे गुतंवण्यासोबतच दर महिन्याला ठराविक रक्कमही गुतंवता येते. 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. अशा प्रकारे छोट्या गुंतवणुकीतून काही वर्षात चांगले रिटर्न मिळतात. तसेच म्यूचअल फंडच्या कामगिरीनुसार त्यातील गुतंवणूक किंवा हप्ता कमी जास्तही करता येतो. त्यामुळे या गुतंवणुकीकडे अनेकांचा कल वाढत आहे. गेल्या पाच वर्षात 30 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देणारे हे काही म्यूचुअल फंड आहेत.
Mirae Asset Emerging Bluechip Fund
रिटर्न (1 वर्ष)- 60.53%
रिटर्न (3 वर्ष)- 33.55%
रिटर्न (5 वर्ष)- 23.94%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 1000 रुपये)
PGIM India Midcap Opportunities Fund
रिटर्न (1 वर्ष)- 91%
रिटर्न (3 वर्ष)- 48.47%
रिटर्न (5 वर्ष)-29.05%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 1000 रुपये)
Quant Active Fund
रिटर्न (1 वर्ष)- 90.46%
रिटर्न (3 वर्ष)- 46.32%
रिटर्न (5 वर्ष)- 30.42%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 1000 रुपये)
Kotak Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 110.99%
रिटर्न (3 वर्ष)- 47.19%
रिटर्न (5 वर्ष)- 27.42%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 1000 रुपये)
Axis Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 89%
रिटर्न (3 वर्ष)- 41.74%
रिटर्न (5 वर्ष)- 28%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 1000 रुपये)
SBI Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 79.62%
रिटर्न (3 वर्ष)- 38%
रिटर्न (5 वर्ष)- 25.1%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 500 रुपये)
HDFC Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 106.58%
रिटर्न (3 वर्ष)- 35.89%
रिटर्न (5 वर्ष)- 22.26%
(गुंतवणुकीसाठी कमीतकमी SIP 500 रुपये)




























































