एलियनसोबत सेक्स केलं, ब्रिटनमधील शेकडो नागरिकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परग्रहावर असलेले लोक म्हणजे एलियन. त्यांच्याबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल असतं. पण ब्रिटनमध्ये अनेक लोकांनी एक विचित्र दावा केला आहे.

ब्रिटनमध्ये शेकडो लोकांनी असा दावा केला आहे की त्यांनी एलियनसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणात 300 जणांनी हा दावा केला आहे.

त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी हिरव्या रंगाच्या छोट्या आकाराच्या स्त्री पुरुषांशी शरीरसंबंध ठेवले आहेत. या वेबसाईटचं नाव बजबिंगो डॉट कॉम असं आहे. या वेबसाईटवर हे सर्वेक्षण करण्यात आलं.

या सर्वेक्षणात सहभाग घेणारे बहुतांश लोक नोरफोक काउंटीतील एलियनचा हॉट स्पॉट मानलं जाणाऱ्या नॉर्विच शहरात रहणारी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हा दावा केला आहे. तसच या शहरात अजब घटना घडण्याच प्रमाण वाढलं आहे.

अर्थात या दाव्यावर कुणाचा विश्वास नसला तरी या दाव्याने खळबळ माजली आहे.