
हिंदुस्थानचा टेनिसपटू लिएंडर पेस याचे अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत गोव्यात फिरत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोव्यातील Pousada By The Beach या क्लबने त्यांच्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगतेय.
किम व लिएंडर दोघेही गोव्यात असून ते तेथील Pousada By The Beach या हॉटेलवर उतरले आहेत. या हॉटेलने त्यांचे काही फोटो शेअर केले. तसेच किम शर्माने तिच्या एकटीचा एक फोटो इंस्टाग्रावर शेअर करत त्यातील कॅप्शन मध्ये MR.P असे लिहले आहे. मुंबई मध्येही लिएंडर व किम अनेकदा एकत्र दिसतात. जिमला देखील ते अनेकदा एकत्र जात असतात. त्यात आता या क्लबने शेअर केलेल्या फोटोंनंतर त्यांच्या नात्याबाबत अधिकच चर्चा रंगू लागली आहे.
किम शर्मा व टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे बरेच वर्ष अफेयर होते. मात्र युवराजच्या आईला त्यांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने युवराजने किमसोबतचे नाते तोडल्याचे बोलले जाते. त्यानंतर युवराज अभिनेत्री हेजल किचसोबत लग्नबंधनात अडकला. तर किम हिंदुस्थानी वंशाच्या नायजेरियन उद्योगपतीसोबत लग्न करून तेथे स्थायिक झाली होती. मात्र किमचा नवरा अली याला दुसरी महिला आवडायला लागल्याने किम व त्याचा देखील घटस्फोट झाला आहे.




























































