‘यूजीसी’ने इतिहासाच्या अभ्यासक्रमातून केली अकबर, मुघलांची गच्छंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुस्लिम आक्रमकांची गच्छंती केली आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या इतिहास विषयात अकबर आणि मुघलांपेक्षा राणा प्रताप, सम्राट विक्रमादित्य यांच्यावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे.

इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाचा नवा आराखडा ‘यूजीसी’ने बनवला आहे. त्यात हिंदुस्थानच्या समृद्ध इतिहासात आक्रमणे करून येथील संस्कृती उद्ध्वस्त करणाऱया मुस्लिम आक्रमकांना जागा देण्यात आलेली नाही. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (1206 ते 1707)’ या शीर्षकाखाली सांगितल्या जाणाऱया इतिहासात अकबर आणि मुघल यांना वगळून राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात आला आहे.

‘आयडिया ऑफ भारत’ यामध्ये हिंदुस्थानातील राजकीय बाबींपेक्षा धार्मिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित हा नवा प्रस्तावित अभ्यासक्रम असणार असून त्याद्वारे पदवीपूर्व विद्यार्थ्यांना धर्माचे ज्ञान देण्याचाही प्रयत्न असणार आहे. प्राचीन हिंदुस्थानातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीही माहिती इतिहासाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. वैदिक काळातील हिंदुस्थान कसा होता, वेद आणि उपनिषदे यांचीही माहिती विद्यार्थ्यांना इतिहासातून मिळणार आहे असे सूत्रांकडून समजते.

इतिहासाची तोडपह्ड करण्याचा, तो लपवण्याचा ‘यूजीसी’चा हा प्रयत्न असल्याची टीका होऊ लागली आहे. जातीव्यवस्था आणि ती दूर करण्यासाठी झालेली सामाजिक आंदोलने यांना इतिहासात महत्त्व दिले गेले पाहिजे, असे मत विचारवंतांनी व्यक्त केले आहे.