मुकेश अंबानींकडे ‘जस्ट डायल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिटेल व्यवसायात आघाडी घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. देशभरातील कोटय़वधी छोटय़ा मोठय़ा व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या क्षेत्रातील ‘जस्ट डायल’ ही कंपनीच थेट खरेदी करण्याची योजना आखली आहे.

रियालन्स समूहाकडून जवळपास 6 हजार कोटी रुपयांत ‘जस्ट डायल’ची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. रिलायन्सकडून कंपनी खरेदीच्या हालचाली सुरू होताच संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

रिलायन्सच्या ऑफरवर आज चर्चा

‘जस्ट डायल’साठी टाटा समूहाकडून देखील एप्रिल महिन्यात प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर रिलायन्स समूहाने यात एंट्री घेतली आहे. 16 जुलै रोजी ‘जस्ट डायल’च्या संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत रिलायन्सच्या ऑफरवर चर्चा होऊन दोन कंपन्यांमधील व्यवहाराची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘जस्ट डायल’ इतकी महत्त्वाची का?

  • तंत्रज्ञान विकासाने ई-कॉमर्स कंपन्या, बी टू बी मंच नावारूपाला आले असले तरी त्यांची पोहोच मर्यादित आहे. ‘जस्ट डायल’कडे देशभरातील तब्बल 3 कोटी व्यावसायिकांचा डेटाबेस आहे.
  • आर्थिक वर्ष 2020 मध्ये ‘जस्ट डायल’च्या 8888888888 या क्रमांकावर सरासरी 15 कोटी 33 लाख युनिक युजर्सने भेट दिली. सुमारे 82 टक्के युजर जस्ट डायल मोबाईल आणि अॅपमधून सर्च करतो.
  • 250 हून अधिक शहरे आणि 11 हजार पिनकोड्समधील व्यावसायिकांची जस्ट डायलकडे आहे माहिती आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीला 950 कोटींचा महसूल मिळाला.
  • 31 मार्च 2020 अखेर 272.9 कोटींचा नफा झाला आहे. कंपनीमध्ये 35.32 टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे तर 28.68 टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आहे.