हिंदुस्थानी लष्कराचा भाजीवालाच निघाला आयएसआय एजंट, लष्करी गुपिते पाकिस्तानला पुरवल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱया हबिबूर रहमान (34) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हबिबूर हा मुळचा राजस्थानातील बिकानेर इथला रहिवासी असून त्याच्यासह एका लष्करी जवानाला पोखरणमधून अटक करण्यात आली आहे. हबिबूर लष्करी कॅम्पसना घाऊक भाजी पुरवायचा. तो हिंदुस्थानी लष्कराची गोपनीय माहिती आणि त्यांच्यावर देखरेख ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून महत्त्वपूर्ण नकाशा आणि लष्करासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

हबिबूरची चौकशी केल्यानंतर त्याने त्याला कुणी कुणी मदत याबाबतचा खुलासा केला आहे. गोपनीय माहिती आणि नकाशा हिंदुस्थानी लष्कराच्या जवानाने दिल्याची कबुली हबिबूरने दिली आहे. त्यामुळे लष्कराचा एक जवान संशयाच्या भोवऱयात आहे. जवानाला चौकशीसाठी आग्रा येथे बोलवण्यात आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर पोलिसांनी हबिबूरला मदत करणाऱया काही जणांना अटक केली आहे. आग्रा येथे तैनात असलेला जवान परमजीत काwर याने लष्करी गुपितांची कागदपत्रे दिल्याची कबुली आरोपी हबिबूरने दिली आहे.

कोण आहे भाजीवाला हेर हबिबूर?

34 वर्षीय हबिबूर रेहमान हा अनेक वर्षे पोखरण आर्मी बेसला भाजी पुरवत असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठेका पद्धतीवर भाजी पुरवण्याचे काम तो करत होता. तेव्हा तिथे त्याने काही जवानांशी सलगी केली आणि पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेला लष्करी गुप्त माहिती पुरवण्याचे काम केल्याचे उघड झाले आहे. रेहमान हा पाकिस्तानच्या आयएसआय यंत्रणेसाठी काम करत होता. तसेच त्याने आयएसआयसाठी संपूर्ण देशाचा दौरा केल्याचंही निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला राजस्थानच्या पोखरण येथून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. हबिबूरच्या अटकेनंतर हेरगिरीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.