
शुक्रवारी पहाटेपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे सायन, माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे लोकल गाड्या एकामागोमाग खोळंबून राहिल्या होत्या. कामाचं ठिकाण गाठण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळावरून चालायला सुरुवात केली.






























































