जालना – पारधला पावसाने धो-धो धुतले, रायघोळ नदीला पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग दोन तास पडलेल्या पावसाने रायघोळ नदीला मोठा पूर आला, तर जनता विद्यालयाच्या आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात पाणी साचले.

paradh-rain

भोकरदन तालुक्यातील पारध येथे तब्बल 25 ते 30 दिवसातर पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले तर रायघोळ नदीला पूर आला.