श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेल्या 5 गायींची सुटका, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायींची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. करण सुरेश कांबळे (रा. टिळकनगर, श्रीरामपूर) आणि फिरोज मुसा कुरेशी (रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.

शहरातील टिळकनगर परिसरातील संविधान कॉलनी येथील एका घराजवळ पाच गाई कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून गायींची सुटका केली. या बाबत पोलीस कान्स्टेबल नितीन सुभाष चव्हाण यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5, 5 (बी) 9, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (सी) (जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.